साळशिंगमळा विठलापूर शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -मा.श्री. मुक्तेश्वर माडगूळकर साहेब


सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर
शाळेने आयोजित केलेल्या कलादर्शन 2024 या कार्यक्रमावेळी ‘साळसिंगमळा विठलापूर मॉडेल स्कूल ही शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध’असल्याचे उद् गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आटपाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय श्री.मुक्तेश्वर माडगूळकर साहेब यांनी काढले. सालाबादाप्रमाणे याही वर्षी शाळेने कलाविष्कार हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमांमध्ये विविध गुणदर्शन,माता पालक व विद्यार्थी यांच्या वर्षभरात घेणेत आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण हा कार्यक्रम घेतला यावेळी ते बोलत होते.यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माननीय श्री.यु.टी.जाधव सर, शिक्षक समिती आटपाडी तालुका अध्यक्ष श्री.संजय कबीर सर तसेच शिक्षक सेवक पतसंस्थेचे सर्व नूतन संचालक व शाळेवर प्रेम करणारे उपस्थित गुरुजन यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाळेत मुख्याध्यापक सौ.शोभा काळे मॅडम,श्री.प्रवीण बाड सर, श्री. सचिन नामदास सर व श्री. सुभाष भजनावळे सर हे अध्यापन करीत आहेत.शाळेला प्रशस्त असे क्रीडांगण, परसबाग,संगणक लॅब, प्रयोगशाळा,वाचनालय असून नवागतांचे स्वागत,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,सर्व क्रीडा प्रकार, अभिरुप बँक,अभिरुप बाजार, रोबोटीक कोडिंग प्रशिक्षण, सहल, विविध गुणदर्शन,परिसर भेट, विज्ञान जत्रा, योगाभ्यास, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा, गायन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविले जातात.शाळेने विविध स्पर्धा व गुणवत्ता शोध परीक्षा मध्ये घवघवीत यश मिळवले आहे.शाळेने भरविलेल्या अभिरूप चिमुकल्यांच्या बाजारामध्ये 30,000 रुपयाची उलाढाल झाली.सदर बाजारासाठी सर्व ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच सर्व सदस्य यांनी हजेरी लावली व चिमुकल्यांकडून भरपूर साहित्य खरेदी केले. शाळेला नेहमीच शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे सहकार्य लाभते.शाळेने राबवलेल्या उपक्रमाचे सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page