धक्कादायक – नराळे परिसरातील डोंगराळ भागात लांडग्यांच्या टोळीची दहशत ; काही ग्रामस्थावर केले हल्ले

नराळे / संतोष कांबळे

Advertisement

प्रामुख्याने दुष्काळी टापूत सर्वाधिक संख्येने दिसणारे लांडगे आता नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने सैरभैर झाले आहेत. विशेषतः सांगोला तालुक्यातील नराळे परिसरातील डोंगराळ भाग सोडून अन्नाच्या शोधात लांडगे शिवार ओलांडून गावात, शेतशिवारातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. विशेषतः काही ग्रामस्थांच्या वर हि हल्ले झाले असून या परिसरात भीती वातावरण निर्माण झाले आहे .
आजवर आपण कुत्रे, रानडुकरे, बिबट्या यांच्या मानवावर झालेल्या हल्ल्याच्या घटना वाचल्या असतील. मात्र आता जंगलातील लांडगे देखील मनुष्यवस्तीकडे आपली वाटचाल करत मानवावर हल्ले करू लागले आहे. जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसत आहे. डोंगरभागातील नराळे गावांतर्गत असलेल्या शेतामध्ये येथे लांडग्याने धुमाकूळ घालत ग्रामस्थांच्या वर हल्ले करीत जखमी केले आहेत .दरम्यान मानवाबरोबरच या लांडग्यांनी अनेक जनावरांवरही हल्ला केल्याने परिसरात कमालीची भीती पसरली आहे.विशेषतः इतर प्राणांचे प्रणाम वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी सांगोला वन विभागाकडे या जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे होणारा संचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page