ह.भ.प.बाळू महाराज यांच्या आगळ्यावेगळ्या बहारदार आणि संगीतमय कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध…

नाझरे/प्रतिनिधी:रवीराज शेटे
मागच्या नऊ दिवसापासून श्रीक्षेत्र नाझरे येथे चालू असलेल्या महासोमयाग यज्ञात आज यज्ञभूमीवर यज्ञ निरूपणकार हरिभक्त परायण बाळू महाराज नाव्हेकर यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले.प.पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांच्या “दत्ता मजला प्रसन्न होशी” या पदावर पूर्वरंग तर संत नामदेव महाराज आणि परिसाभागवत यांच्या चरित्रावर उत्तररंग त्यांनी सादर केला. मनमुराद हसवत हार्मोनियमच्या आगळ्यावेगळ्या गमती जमती करीत आपल्या खुमासदार विनोदी शैलीने त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले;श्रोते अक्षरशः डोलत होते,टाळ्यांनी प्रतिसाद देत होते.यातील हृदयस्पर्शी, भावविभोर कथा प्रसंग सांगताना वक्ता आणि श्रोते तल्लीन झाले होते. सोमयागाच्या निमित्ताने सेलूकर महाराजांचा संतसंग लाभला हे आमचे जन्मोजन्मीचे भाग्य आहे आणि त्यांच्या आदर्श आणि त्याग संपन्न जीवनाने आम्हास खरे मार्गदर्शन लाभते असे भावपूर्ण उद्गार त्यांनी व्यक्त केले. संतकृपा स्पर्शाने मानवी जीवन सर्वोच्च मूल्यांनी अलंकृत होते;हा त्यांच्या कीर्तनाच्या निरुपणाचा भाग होता.त्यांच्या कीर्तनाने श्रोत्यांना एका वेगळ्याच शैलीच्या सादरीकरणाचा आनंद मिळाला;या कीर्तनात तबल्याची साथ श्री.सचिन देशपांडे यांनी केली तर टाळाची साथ ह.भ.प.डॉ.ना.पा.देशपांडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page