पारे गावात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

सांगोला तालुक्यातील पारे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा व इंग्लिश मिडियमच्या वतीने सांस्कृतिक व देशभक्तीपर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये हुकुमसिंग साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष औदुंबर पवार होते .त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहण मेजर बाळासाहेब गेजगे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर कारगिल वीर जवान स्मारकाला मानवंदना मेजर शंकर गायकवाड यांनी दिली . आर एम इंग्लिश मिडियमचे ध्वजारोहण डॉ कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष म्हणून मिस चार्पल या होत्या .विशेषतः ग्रामपंचायत ध्वजारोहण मेजर राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दादासाहेब सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले .
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सीबीएस न्युज चे संपादक चाँदभैय्या शेख हे लाभले होते .सुरवातीला विद्यार्थ्यांच्या संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सदर केली .या मध्ये विद्यार्थांनी सादर उपक्रमाने उपस्थित साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सरपंच कांचन बाई चव्हाण माजी सरपंच संतोष पाटील ,माजी सरपंच मधूकर गोरड सर ,तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्या सह ग्रामसेवक ,तलाठी ,पोलीस पाटील यांच्या सह गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page