बीडमध्ये 100 वे विभागीय नाट्य संमेलन ; 2 फेब्रूवारीला उद्घाटन : अ. भा. नाट्य परिषदेचा पुढाकार

बीड प्रतिनिधी – सोमनाथ कुचेकर

Advertisement

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे विभागीय नाट्य संमेलन बीड येथे होत आहे .2 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री धनजय मुंढे यांच्या हस्ते व माजी मंत्री पंकजा मुंडे व इतर मंत्री ,आजी-माजी आमदारांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे . या संमेलनात प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, संदीप पाठक सारखे अनेक कलाकार यात उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, आयोजक समिती अध्यक्ष डॉ. दीपाक्षीरसागर यांनी पत्रकार परिषद हि माहिती दिली.जब्बार पटेल हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा(10:30) वाजता स्व. केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरी स्व. सुहासिनी इर्लेकर रंगमंच परसनगरी माने कॉम्प्लेक्स येथे संपन्न होणार आहे. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलना पासून दिंडी निघणार यात सर्व कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील शाळेतील विद्यार्थी वेगवेगळी वेशभूषा , देखावे सादर करणार आहेत.या नाट्य संमेलनात नाटक,लावणी, बालनाट्य, एकपात्री प्रयोग,संगीतरजिनी आदी. कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पहिल्यांदाच असा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने बीडच तर मराठवाड्यातील सर्व रसिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा . असे आव्हानही स्वागताध्यक्ष योगेश क्षीरसागर , आयोजक समिती अध्यक्ष दीपा क्षीरसागर , डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page