ब्रेकिंग – राजकीय क्षेत्रात खळबळजनक घटना घडण्याची शक्यता ; आज उपमुख्यमंत्री अजितदादा सोलापूरच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शनिवारी (ता. ३ फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा हे प्रथमच सोलापुरात येत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पवार हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेले दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांची तिऱ्हे येथे भेटणार घेणार आहेत. तसेच, तळ्यात-मळ्यात असलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासाठी दादांनी राखीव वेळ दिला आहे. त्यामुळे आजच्या दौऱ्यातून एखादी खळबळजनक घटना समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः या दौऱ्याच्या संदर्भात जिल्हा अध्यक्ष दिपक आबा साळुंखे पाटील यांनी जय्यत तयारी केली आहे

Advertisement

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार हे आज शनिवार दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शनिवार, दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता रे- नगर, कुंभारे, ता. दक्षिण सोलापूर येथे आगमन. 9.45 वा. ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिर- दर्शन. सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,
सोलापूर येथे आगमन व जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती.नंतर पत्रकार परिषद. दुपारी 12.45 वा. रामवाडी सोलापूर येथे आगमन व महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबीर व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी 1.30 ते 2.15 राखीव. 2.30 वा. एम्पलायमेंट चौक, सोलापूर येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय उद्घाटन समारंभ उपस्थिती.
3.00 वा. जुनी मिल कंपाऊंड चौक, सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. 4.30 वा. जामगुंडे मंगल कार्यालय,आसरा चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वा. हॉटेल बालाजी सरोवर येथे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स उपस्थिती. सायंकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव. 8.10 वा. मिलींद नगर, बुधवारपेठ येथे राखीव. 8.45 वा. तिरें, ता. उत्तर सोलापूर येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण करतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page