स्वर्गीय रुद्रमा वसंतराव पाटील रक्षा विसर्जन कार्यक्रम संपन्न

नाझरे प्रतिनिधी / रवीराज शेटे
श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा व डॉक्टर गणपतराव देशमुख सूतगिरणीच्या माजी संचालिका रुद्र मा वसंतराव पाटील यांचे गुरुवारी एक फेब्रुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
सूतगिरणीचे प्रथम चेअरमन स्वर्गीय वसंतराव पाटील यांनी सूतगिरणीचा अटकेपार झेंडा फडकविला व महाराष्ट्रात व देशात प्रथम क्रमांक पटकाविला तसेच श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळ निर्माण करून शैक्षणिक दरवाजे उघडले व त्यांच्या यशात त्यांच्या अर्धांगिनी रुद्रमा पाटील यांचा मोठा सहभाग होता. शेती विषयक जबाबदारी प्रापंचिक जबाबदारी रुद्रमा पाटील यांनी व्यवस्थितपणे सांभाळली तसेच श्रीधर कन्या प्रशाला संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली त्यांच्या जाण्याने नाझरे व परिसर दुःखमय झाला असून त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे असे श्रद्धांजली प्रसंगी शिक्षक बंडोपंत येडगे, सूतगिरणी चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, भाजपा अध्यक्ष नंदकुमार रायचुरे, मुख्याध्यापक काटे सर, माजी मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी व माजी प्राचार्य सुबराव बंडगर सर इत्यादींनी शोक सभेत सांगितले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी सामुदायिक श्रद्धांजली घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page