जिल्हा परिषद शाळा कामथ येथे महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न.

सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर

Advertisement

(आटपाडी) दिनांक ९मार्च ज्या मनगटात बळ,बुध्दी,आणि चातुर्य आहे.तीच महिला आपल्या मुलांचा सर्वागीण विकास करू शकते या भूमिकेतून हा नवीन उपक्रम घेण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथ येथे जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून कामथ पंचक्रोशीतील सर्व महिलांच्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी कला,क्रीडा,व बौद्धिक अशा पध्दतीच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. परिसरातील शेकडो महिलांनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बराच महिलांचा सन्मान करण्यात आला.शाळेची माजी विद्यार्थीनी ,लोकनियुक्त सरपंच मुढेवाडी कु. उज्ज्वला बाबासाहेब ऐवळे यांचा ही यथोचित मानसन्मान करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ हौसाबाई .कोकरे हे होत्या.हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून साकार व यशस्वी केला त्या आमच्या प्रशालेच्या रणरागिणी,अष्टपैलू नेतृत्व, हरहुन्नरी व्यक्तीमत्व, जिजाऊ, अहिल्या,सावित्री,रमाई,अशा अनेक महान माता यांचे विचार आचार प्रत्यक्षात आचरणात आणून अमंलबजावणी करणा-या सौ.पुजा जनार्धन मोरे मोटे मॅडम.या कार्यक्रमात सहभागी सर्व माता भगिनी साठी बक्षीस देणा-या आदर्श माता माया भिमराव कोकरे,
आजच्या कार्यक्रमात खास आकर्षण असणाऱ्या पैठणी चे मानकरी ठरलेल्या सौ.अंकिता राहूल मोटे पाटील. दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या सौ. स्वाती धर्मेंद्र पावणे.तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी सौ. शकुंतला प्रल्हाद कुंभार,चौथ्या क्रमांकाचे मानकरी विद्या किरण शेंडगे.पाचव्या क्रमांकाचे अंजना शिवाजी सरक.सहावा क्रमांक.सौ. नम्रता नंदकिशोर सरक यांना मुख्य सहा बक्षिसे मिळाली. या कार्यक्रमासाठी विशेष अर्थसहाय्य बक्षिसे लावली त्यांचा ही यथोचित मानसन्मान करण्यात आला.पैठणी देणा-या सौ. स्वाती नानासाहेब झुरे,कुकर सेट देणा-या जेष्ठ समाजसेविका आदर्श माता विमल ईश्वर हेगडे ,. डिनर सेट देणा-या निंबवडे गावच्या माजी लोकनियुक्त सरपंच नंदाताई शांताराम देठे मॅडम,लेमन सेट व साहित्य देणा-या सौ.वर्षा राणी सचिन सरक मॅडम,सौ.छाया अशोक सरक मॅडम,सौ. वैशाली सुनील माने माजी उपसरपंच,सौ.वर्षा अनिल शिंगाडे व अन्य काही दात्यांनी मदत केली या सर्वांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला.आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कामथ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रुपालीताई ज्ञानेश्वर कारंडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व महिला सदस्य,ग्रामपंचायत मधील सर्व महिला सदस्य,. पोलीस पाटील सौ.स्वाती सदाशिव सरक,अंगणवाडी सेविका व मदतनीस,शाळेचे जेष्ठ शिक्षक सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. कुंडलिक देवडकर सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.बालाजी अंबुरेसर,शाळेचे सह शिक्षक , व्हा. चेअरमन आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेचे श्री. नानासाहेब झुरे सर. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक केले ते निंबवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री यशवंत गोडसे सर , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.संतोष आबा देवडकर. या कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचालन व आभार सौ. पुजा जनार्धन मोरे मोटे मॅडमने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page