ब्रेकिंग न्यूज – सावे येथे वीज पडून गाई ठार ; शेतकऱ्याला नुकसान भरपूर देण्याची मागणी

ब्रेकिंग न्यूज – सावे येथे वीज पडून गाई ठार ; शेतकऱ्याला नुकसान भरपूर देण्याची मागणी

Advertisement

सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणी आज अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह सर्वत्र हजेरी लावली असून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये तालुक्यातील सावे येथील शेतकरी आनंदा शेजाळ यांच्या घराशेजारच्या झाडाला बांधलेल्या गाई वर वीज पडल्याने गाई जागीच ठार झाली आहे .आंनदा शेजाळ या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे .संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे येत आहे .आधीच दुष्काळ ग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱी मेटाकुटीला आला आहे .यामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कंगाल होण्याच्या मार्गावर आहे .विशेषतः यावेळी विविध मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन अडीअडचणी समजून घेतल्या.व संबंधित विभागाला नुकसान भरपाई देण्यासाठी आवाहन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page