राजकीय घडामोडीला वेग  – आज रात्री अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील सहकुटुंब भेटणार भाग्यश्री बंगल्यावर…स्नेहभोजनही होणार…!


इंदापूर प्रतिनिधी: अंजली पाटील
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जायंट किलर बनवल्या जाणाऱ्या इंदापूरात राष्ट्रवादीचे सर्वच नेते अजित पवारांच्या पाठीशी असताना तालुक्यात बरोबरीत असलेल्या भाजपशी जुळवून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार कसोशीने प्रयत्न करत आहेत ,आता इंदापुरात पुन्हा महाविकास आघाडीचा तराजू तुल्यबळ झाल्यानंतर अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या बरोबर आणखी सूत जुळविण्याचे ठरवले आहे .शुक्रवारी संध्याकाळी भाग्यश्री बंगल्यावर पाटील- पवारांच्या डिनर डिप्लोमसी होणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला अजित पवारांच्या आजवरच्या राजकीय जाचावरून इंदापूर पासून ते मुंबई पर्यंत अनेक कानपिचक्या दिल्या, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अगोदर मुंबईत व त्यानंतर इंदापूरात कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवारांच्या विजयाची आण घेतली . कार्यकर्त्यांनाही दिली.
इंदापूरत महाविकास आघाडीसाठी अजित पवारांनी मोठा नेता शिल्लक ठेवलाच नव्हता काही दिवसांसाठी प्रवीण माने सोबतीला गेले , तर स्वतः अजित पवारांपासून देवेंद्र फडणवीसांही शर्थीचे प्रयत्न केले आणि तोही नेता महाविकास आघाडीपासून दूर गेला. मात्र अचानकच अजित पवारांचेच सहकारी आप्पासाहेब जगदाळे यांनी सूर बदलला आणि शहरातील मातब्बर नेते भरत शहा यांना बरोबर घेत इंदापुरात महाविकास आघाडीचा तंबू पुन्हा रोवला.
आता अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांची गरज प्रकर्षाने महत्त्वाची ठरणार आहे , त्यामुळेच येत्या दहा ते पंधरा दिवसात भाजप व राष्ट्रवादीतील दरी कमी करण्यासाठी अजित पवार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी संध्याकाळी हर्षवर्धन पाटलांच्या भाग्यश्री बंगल्यावर अजित पवारांसाठी स्नेह भोजनाची मेजवानी आहे. अर्थात आगोदर वाघ पॅलेस मध्ये कार्यकर्त्यांसमवेत मेळावा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page