जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू ध्यैर्यशील मोहिते पाटील

जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू ध्यैर्यशील मोहिते पाटील

नाझरे / रवीराज शेटे
विजय दादा, आबासाहेब, मालक यांनी जिल्ह्याचे राजकारण करताना पक्षभेद बाजूला ठेवून विकास कामे केली व हा विकास कामाचा वसा आमचे आजोबा शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून आलेला आहे व मी खोटी आश्वासने एवढे कोटी आणतो असे देणार नाही व शंकराव मोहिते पाटील, आबासाहेब व विजय दादा यांचे नाव खराब होईल असे काम करणार नाही तर मनापासून सेवा करीन व आपल्या सेवेत राहील त्यामुळे विकास कामासाठी व जनतेच्या सेवेसाठी जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू असे मत इंडिया आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार ध्येयशील मोहिते पाटील यांनी नाझरे ता. सांगोला येथे प्रचार सभेत व्यक्त केले.
तसेच तरुणांसाठी एमआयडीसी उभी करून छोटे छोटे उद्योगधंदे उभा करून रोजगार उपलब्ध करून देऊ व तुम्हा सर्वांच्या साक्षीने माझी उमेदवारी आहे व याबाबत मी प्रत्येक तालुक्यात दौरा केला व यावेळी तुम्हीच उभे रहा व तुतारी हातात घ्या असे सांगितले त्यामुळे आपण मला आशीर्वाद देऊन विजयी करा असेही मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीस माजी उपसभापती सुनील चौगुले यांनी प्रस्तावित केले. तसेच पाण्यासाठी आपला लढा यशस्वी झाला व आज त्याचे श्रेय दुसरे घेत आहेत व शिवस्मारक उभे करू असे भाजपाने सांगितले परंतु केले नाही तर भाजपाच्या कोणत्याही उमेदवारास विजयी करू नका असे पाणी संघर्ष समितीचे प्रफुल्ल भैया कदम यांनी यावेळी सांगितले. तर पवार साहेबांचा नाद कोणी करू नये वयाच्या 84 व्या वर्षी ते जोमाने काम करतात व ध्येय भैया एक उत्तम संघटक आहेत त्यांना विजयी करा असे मत माजी जि प अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांनी व्यक्त केले. तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करून असे खोटे आश्वासन भाजपने दिले व शेतकऱ्याच्या वर अन्याय केला तो दूर करण्यासाठी मोहिते पाटील यांना विजयी करा असे मत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले. तर भाजप सत्तेवर आला तर येथून पुढे निवडणुका होणार नाहीत कारण जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व नगरपालिका या निवडणुका त्यांनी घेतल्या नाहीत व यासाठी भाजपला रोखा व मोहिते पाटील यांना विजयी करा असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबुराव भाऊ गायकवाड यांनी व्यक्त केले.
भाजपाने अच्छे दिन आणू असे सांगितले व ते आज आले का तर नाही केवळ काँग्रेसवर टीका करायची एवढेच त्यांचे धोरण आहे त्यामुळे चहा वाल्याला चहाच्या टपरीकडे पाठवा व आपल्या जवळचे म्हणजे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांना विजयी करा व लांबच्या उमेदवाराला जवळ करू नका असे मत माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी व्यक्त केले. तर आबासाहेब वसंतराव पाटील यांच्या विचाराचे नाझरे गाव असून ते शेतकरी कामगार पक्षाचे आहे त्यामुळे येथून लीड मिळणार व यात विजय दादांची साथ आहे त्यामुळे पवार साहेबांच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहून धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करा व तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे बटन दाबून विकासास मत द्या असे मत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. आज सांगोला तालुक्यात सर्वत्र विकासाच्या नावाखाली सर्व काही चालू आहे येथील मान नदीत माझ्या उंचीपेक्षाही मोठे मोठे खड्डे पडले आहेत व ते कशामुळे यासाठी परिवर्तन घडून आणावे असेही यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Advertisement
सदर प्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, जि.प. सदस्य दादासो बाबर, प,स. सदस्य दिगंबर शिंगाडे, माजी सरपंच हनुमंत सरगर, साहेबराव ढेकळे, प्राचार्य सुबराव बंडगर, बाले खान शेख, जालिंदर बाबर, विकास मोहिते, काँग्रेस अध्यक्ष सुमित्रा लोहार, उपसरपंच मधुकर आलदर, शशिकांत पाटील, अरविंद पाटील, महेश नलवडे, डॉक्टर विजय सरगर, हरिभाऊ पाटील, पंत सरगर, सौ. शितल देवी मोहिते पाटील, संजय सरगर, युवा नेते नितीन रणदिवे, सागर वाघमारे, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिवाजी सरगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page