सांगली (आटपाडी दिनांक १२ मे २०२४ )रोजी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सांगली परिवार यांच्यामार्फत कल्लेश्वर मंदिर आटपाडी आणि बांबवडे ता पलूस मध्ये रक्तदान शिबीर पार पडले, या शिबिरात आटपाडी ७० आणि बांबवडे ४३ रक्तविरांनी रक्तदान करून स्वर्गीय प्रवीण पिसाळ यांना आदरांजली वाहिली या रक्तदान शिबिरात विविध जातीधर्मातील एकूण 113 बांधवांनी रक्तदान करून एक नवीन आदर्श समाजा समोर ठेवला, कारण विज्ञानाने इतकी प्रगती केली तरीही, रक्त हे कुठेही तयार होत नाही तर मानवी शरीरातून ते दान करून गरजू रुग्णाला वापरले जाते या रक्त संकलन केलेल्या बॅग गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे काम करतील आणि त्यांना अनमोल असे जीवनदान मिळेल, रक्तदान करून 113 बांधवांनी अश्यांप्रकारे समाजाला एक सकारात्मक संदेश दिला, सदर शिबिरात महिला वर्गाने सुधा चांगला प्रतिसाद दिला पण काही महिलांना HB कमी असल्याने रक्तदान करता आले नाही.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रिटायर सुबेदार पांडुरंग जरे, सुबेदार कालिदास पाटील, नाईक सुबेदार विजय कदम, डॉ M Y पाटील, प्रदीप पाटील सर, अश्विनकुमार पाटील,चंद्रहार पाटील,अभियंता तानाजी निकम तसेच WMO परिवारातील संपूर्ण प्रबंधक टीम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) तर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, सदर रक्तदान शिबिर WMO चे कार्यवाहक निलेश पिसाळ, कार्याध्यक्ष अवधूत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. रक्तदान शिबीर,आरोग्य तपासनी शिबीर, वृक्षारोपण,शालेय शैक्षणिक साहित्य वाटप तसेच समाज उपयोगी उपक्रम वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( WMO ) परिवार नेहमी करत असतो आणि यानंतर सुद्धा करत राहून सामाजिक जवाबदारी पार पाडत राहील अशी माहिती वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सांगलीचे प्रतिनिधी देव मोरे,उदयसिंह पाटील,सुहास चव्हाण आणि WMO सांगली मधील प्रबंधक यांनी दिली आहे..