विशेष बातमी – हंगिरगे विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

विशेष बातमी – हंगिरगे विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

माणगंगा दलित आणि दुर्बल समाज शिक्षण प्रसारक मंडळ मेडशिंगी, संचलित कै. आम. काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय हंगिरगे, ता. सांगोला या प्रशालेचा दहावीचा निकाल ९७.७७ टक्के लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे. परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.प्रथम क्रमांक- कुमारी साक्षी विलास सावंत (९२.२०%), द्वितीय क्रमांक- कुमारी पूनम कोंडीबा गोयकर (९०%), तृतीय क्रमांक विभागून कुमारी गौरी शहाजी सावंत ( ८४%), कुमारी सानिका संजय कोळेकर (८४%) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे… इतर सर्व विद्यार्थ्यांनाही उत्तम गुण मिळाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री माणिकराव शिंदे सर, संचालक डॉ. सुशीलकुमार शिंदे, श्री. सुजित कुमार शिंदे, सौ स्वाती शिंदे तसेच मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व हंगिरगे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या……तसेच प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी साक्षी विलास सावंत, पुनम कोंडीबा गोयकर, गौरी शहाजी सावंत, सानिका संजय कोळेकर यांचा त्यांच्या घरी जाऊन प्रोत्साहन पर सन्मान करण्यात आला… या सत्कार समारंभास संस्थेचे संचालक डॉ. सुशीलकुमार शिंदे, सरपंच श्री. संजय पाटील , मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर श्री. चव्हाण सर, श्री. जाधवसागर भंडे सर, श्री सुरेश सावंत सर, सौ. सावंत मॅडम, श्री. माळी सर, लक्ष्मण माने मामा, श्री. बोरकर सर, श्री. राजाराम साबळे मेजर, श्री. कैलास सावंत, श्री. बंडोपंत साबळे, श्री. विलास साबळे, श्री. नितीन सावंत पाटील, श्री. विलास सावंत, श्री. सर्जेराव वाघ, श्री. सूग्रसेन सावंत, श्री बाबासो काटे, श्री. पोपट सावंत, श्री. शहाजी सावंत, श्री. दादासो सावंत, श्री. कोंडीबा गोयकर, श्री. संजय कोळेकर, श्री. शिवाजी सावंत, कुमारी. शितल कैलास सावंत, कुमारी दीदी सावंत आदी मान्यवर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळेस प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल सद्भावना व्यक्त केल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page