सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील ग्रामस्थांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा केला

सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील ग्रामस्थांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा केला


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी. आण्णासाहेब खरात.
राज्यभरात एक जून ही अनेकजनांची शासकीय जन्मतारीख असते. याच दिवशी खूप जणांचे वाढदिवस असतात. परंतु मे महिना संपून नवीन पालवी वृक्षांच्या माध्यमातून दिसून येते. म्हणूनच एक जून रोजी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यलमार मंगेवाडी येथील ग्रामस्थांनी निर्णय घेतला.व झाडांना फेटा बांधून शाल घालून,हार घातला व केक कापून वाढदिवस साजरा केला.यावेळी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक वृक्षमित्र अजित कंडरे हे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील श्री खंडोबा मंदिर परिसरातील चार एकर माळरानावर सदाशिव बापू सोळशे व अजित दादा कंडरे यांनी चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले होते. आज हे सर्व वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेले असून सावली योग्य झाले आहेत.सध्या महाराष्ट्रात आणि देशभर उष्णतेची लाट आहे. प्रत्येकाला सावली व गारवा हवा आहे. परंतु वृक्ष लागवडीसाठी खूप कमी जण प्रयत्न करतात,ग्रामस्थांनी या सर्व गोष्टीचा विचार करून झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला,अशी माहिती उपसरपंच अनिल पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी या गावाने 2017 साली पाणी फाउंडेशन या योजनेमध्ये सहभाग घेऊन राज्यात नाव कमावले होते.गावातील तरुणांनी आणि सर्वांनी सहभाग घेऊन संपूर्ण गाव पाणी फाउंडेशन च्या कामामध्ये सक्रिय झाले होते,अशी माहिती माजी सरपंच प्रकाश सोळशे यांनी दिली.वृक्ष हेच जीवन आहे आणि आपण सर्वांनी वृक्षारोपण साठी प्रयत्न केले पाहिजेत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या वृक्षांची लागवड करून,घराच्या शेजारी आणि शेतीच्या बांधावर फळांची झाडे लावली पाहिजेत. आपण पैशाने काही खरेदी करू शकतो परंतु ऑक्सिजन साठी काहीच करू शकत नाही.कोविड मध्ये कित्येक रुग्ण ऑक्सिजन शिवाय मृत्युमुखी पडले,तरी देखील आज आपल्याला कोणत्याही गोष्टीची जाणीव उरलेले दिसत नाही.येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.वाढदिवस, पुण्यतिथी,लग्नाची तारीख,मुलीचे लग्न,अशा प्रत्येक मंगलमय प्रसंगी प्रत्येकाने एक झाड तरी लावलेच पाहिजे,असे मत अजित दादा कंडरे यांनी यावेळी व्यक्त केले.या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ.श्रीधर यलमार अभिजीत कंडरे,पायोनियर निवासी गुरुकुल चे संस्थापक प्राचार्य अनिल येलपले सर,बाळू आप्पा येलपले, सचिन येलपले,तुकाराम येलपले, भागवत सोळसे, तातोबा येलपले,अशोक सोळसे,ज्ञानेश्वर भडंगे, बाबुराव सोळसे,रणदिवे सर,अनिकेत सोळसे,किसन येलपले,काका येलपले व ग्रामस्थ आणि पयोनियर निवासी गुरुकुल चे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page