देवेंद्रजीने केलेला अपमानाचा बदला जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाने घेतला. -प्रा बाळासाहेब बळवंतराव

देवेंद्रजीने केलेला अपमानाचा बदला जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाने घेतला. -प्रा बाळासाहेब बळवंतराव

प्रतिनिधी शशिकांत कोळी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कार्तिकी यात्रेच्या वेळी विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी पंढरपूरला आले होते. त्यावेळी कोळी जमातीचे अभ्यासक व पदाधिकारी यांनी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करून न्याय देण्यासाठी वेळ मागितली होती. मराठा समाजाच्या शंभर कार्यकर्त्यांना भेटण्याची परवानगी दिली. परंतु कोळी जमातीच्या दहा लोकांना भेटण्याची परवानगी नाकारून सोलापूर जिल्ह्यातील सोलापुर व माढा लोकसभा मतदारसंघातील अनुक्रमे 90 ते 1लाख व 1 लाख ते सव्वा लाख कोळी जमातीच्या लोकांचा देवेंद्र फडवणीस यांनी अपमान केला होता. भेटीसाठी कोळी व मराठा दोन समाजाचेच प्रतिनिधी रेस्ट हाऊस ला उपस्थित होते मराठा समाजाच्या 100 लोकांना भेटीसाठी आमंत्रित केले परंतु कोळी जमातीच्या दहा ते अकरा लोकांना भेट नाकारून अपमान केला होता. या अपमानाचा बदला आज लोकसभा निवडणुकीमध्ये कोळी जमातीच्या लोकांनी घेतला आहे. असे मत कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी बोलताना सांगितले आहे .
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पराभूत करून काँग्रेसच्या प्रणिती ताई शिंदे यांना निवडून दिले आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मतदान करून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून दिले आहे.2014 च्या व 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यातील कोळी जमातीने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता 45 ते 50 लाख महादेव ,मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीने भाजपाला भरभरून मतदान केल्याने सत्तेमध्ये आले होते. परंतु ज्या कोळी जमातीने देवेंद्र फडवणीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले त्या लोकांना देवेंद्र फडवणीस यांनी वाऱ्यावरती सोडून दिले होते .वारंवार प्रश्नसंदर्भात मीटिंग लावण्यासाठी विनंती करूनही एकही मिटींग घेतली नाही. राज्याच्या 31 जिल्ह्यामध्ये गेली दहा वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने कोळी जमातीचे लोक आंदोलन करत होते उपोषण करत होते त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोळी जमातीने जिल्ह्यातील दोन्हीही उमेदवारांचा पराभव करण्याचे ठरवले होते त्याचे परिणाम आज या ठिकाणी दिसत आहेत.आगामी विधानसभा जर वाचवायचीअसेल तर देवेंद्र फडवणीस यांनी कोळी जमातीच्या प्रश्नासंदर्भात तातडीने मीटिंग घ्यावी. समाजाची खरी बाजू समजून घेऊन न्याय द्यावा .अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या वेळीही भारतीय जनता पार्टीला विरोध करू असे मत कोळी जमातीचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page