कल्पक, कार्यक्षम, सर्वसमावेशक नेतृत्व मा.आमदार दीपक आबा

कल्पक, कार्यक्षम, सर्वसमावेशक नेतृत्व मा.आमदार दीपक आबा

स्वकर्तुत्वाने सोलापूर जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकीय क्षितिजावर स्वयं तेजाने तळपत असलेल्या मा दीपक आबांना 63 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! आज आबांचा वाढदिवस, आजचा दिवस आम्हा जवळेकरांसाठी एक चैतन्यदायी दिवसच आहे. आज मा.दीपक आबांनी स्वकर्तुत्वाने जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यामागे त्यांचा संयमी स्वभाव, सतत कार्य करत राहण्याची वृत्ती, प्रचंड कामाचा उरक, तल्लख स्मरणशक्ती, जनसामान्यांबद्दल आपुलकी, विविध प्रश्नांची नेमकी जाण हीच कारणे आहेत. कार्यतपस्वी आम. काकासाहेब साळुंखे-पाटील व स्वर्गीय भगवतभक्त शारदा देवी साळुंखे-पाटील यांच्या सुवर्णकुशीतून जन्माला आलेल्या आबांनी तालुक्यात व जिल्ह्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केलेले आहे. घराण्यातून आलेले संस्कार, स्व. काकींचा अध्यात्माकडे असणारा ओढा, घरात भागवत धर्माचं असणार संपन्नतेच वारसा सांगणार संस्कारशील वातावरण या सर्वांचा आबांच्या कारकीर्दीवर फार मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आबांच्या वैचारिक बैठकीला कार्यकर्तृत्वाचे मोठे अधिष्ठान लाभले आहे. कोणत्याही लोकनेत्यात गुणग्राहकता,संघटनकौशल्य,नेतृत्वगुण,धोका पत्करण्याची तयारी, इतरांना प्रतिसाद देण्याचे कौशल्य हे सर्व गुण अंगभूत असावे लागतात. ते सर्व गुण त्यांच्यात आहेत. मा.आबांची कार्यपद्धती अत्यंत पारदर्शी स्वरूपाची राहिली आहे. विश्वासार्हता हा राजकीय नेत्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा गुणविशेष, परंतु हीच विश्वासार्हता आबांच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे.त्याच्याच नैतिक अधिष्ठानावर संपूर्ण राजकीय कारकीर्द पोसली आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आपलेपणा वाटतो. 'टिपिकल राजकारणी' ही चौकट मोडीत काढून त्यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारची समाजकारणाची धाटणी विकसित केली आहे. खूपसा पारदर्शी व आश्वासक चेहरा, समाजमन जाणण्याचं अप्रतिम कौशल्य, लोकांच्या मूलभूत प्रश्नांना थेट भिडण्याचा स्वभाव, कोणताही आडपडदा न ठेवता रोखठोक बोलणे व रास्त असेल तेच करणे या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे वेगळेपण इतरांत चांगले उठून दिसते. आपल्या पुढे येणाऱ्या माणसाची पारख करणे हा महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे आहे. एखाद्या माणसाची लांबी,रुंदी,खोली मोजण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. सत्ता असो वा नसो, जनसामान्याची बांधिलकी पत्करून आपला पूर्ण वेळ जनतेच्या सेवेसाठी देणारा हा नेता विरळाच आहे. सध्याची राजकीय परिस्थिती त्यांच्यासाठी खूप कसोटीची आहे. परंतु अशा आव्हानात्मक परिस्थितीत आपला वैचारिक तोल जराही न ढळू देता सातत्याने समाजकार्यात वाहून घेतलेले आहे. आज संपूर्ण सांगोला तालुका त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेने पाहतो आहे. सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप मोठी आपुलकी असून त्यांना मतदान करण्याची संधी आपल्याला कधी मिळते या अपेक्षेत आज तालुक्यातील युवा वर्ग, शेतकरी, मध्यमवर्ग, कर्मचारी, सर्वजण आहेत. आज पर्यंत त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता केलेली समाजसेवा हीच त्यांची मोठी ताकद आहे. त्याचा खूप मोठा फायदा त्यांना पुढील काळासाठी होणार आहे. आज पर्यंत मिळालेली अधिकार पदे ही जनसामान्यांच्या कल्याणासाठी वापरायचे हे तत्त्व त्यांनी आजपर्यंत पाळले आहे. सत्ता पदे ही जनसेवेसाठी स्त्रोत आहेत हे ब्रीद उराशी बाळगून त्यांनी प्रत्येक क्षण न क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे. सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे हे ब्रीद त्यांनी कायमस्वरूपी पत्करले आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील प्रत्येक गाव, सांगोला शहर यामध्ये कार्यकर्त्यांची एक भक्कम फळी आज त्यांच्या नेतृत्वाखाली उभी असून पुढील काळामध्ये खूप मोठे कार्य करण्याची इच्छा मनी बाळगून आहे. एक सकारात्मक विचाराचं विकासात्मक दृष्टिकोन असणार सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संपूर्ण तालुका त्यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. सर्व जाती-धर्माच्या समूहांना आश्वासक, विश्वासार्ह वाटावं असं हे नेतृत्व आहे. तालुक्यातील गोरगरिबांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत व्यापकता असणार हे नेतृत्व आहे. त्यामुळे 'क्लासेस टू मासेस' चालणारे एक गतिमान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजाबरोबर कर्मचारी वर्गाला सुद्धा आपुलकी वाटावी, आत्मीयता वाटावी अशी वर्तणूक त्यांची अधिकारी व कर्मचारी वर्गाशी असते. त्यांच्याविषयी वाटणाऱ्या या आपुलकीनेच अनेक अडचणींची कामे अधिकाऱ्यांकडून बिनबोभाट पूर्ण होतात. सर्वांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत व कायम राहणार आहेत. आज पर्यंत त्यांना ज्या ज्या पदाच्या संधी प्राप्त झाल्या त्याचं अक्षरशः त्यांनी सोनं केलं आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व मतदारात मा.आबांबद्दल विशेष आकर्षण आहे. आपलं मत वाया जाणार नाही, त्या मताचं सोनंच होणार ही खात्री तालुक्यातील जनतेला आहे. दिवसातील १८/१८ तास सर्वसामान्यांच्या कल्याणा साठी देणारे ध्येयवेडे नेतृत्व तालुक्यातील, जिल्ह्यातील जनतेने आज पर्यंत अनुभवले आहे. त्याची परतफेड करण्याची संधी मिळण्यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत. ती संधी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे मिळेल असे सर्वांचे मत आहे. समाजमन जाणणारे नेतृत्व असल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण व ओढ आहे. आजपर्यंत तालुक्यात सत्ता कोणाची आणायची हे आबाच ठरवत आहेत. परंतु आज कार्यकर्त्यांच्या मनात हे आहे की किती दिवस आपण दुसऱ्यांना मदत करायची? आता आपण आपला मार्ग निवडू या. त्यामुळे आज तालुक्यातील आबांचा प्रत्येक कार्यकर्ता एका वेगळ्या ध्येयाने झपाटल्यागत काम करतो आहे. यावेळी निश्चित बदल घडवायचाच या उद्दिष्टाने सर्वजण काम करत आहेत. मा. आबांच्या कुटुंबातील सर्वजण सदस्य खूप मोठ्या वेगाने कामाला लागलेले आहेत.अगदी सौ. रुपमतीदेवी वहिनीसाहेब सुद्धा अनेक कार्यक्रमाला उपस्थिती लावून महिलांमध्ये मिसळण्याची एकही संधी सोडत नाहीत, आणि त्या अक्षरशः दुधात साखर मिसळल्याप्रमाणे सर्वांच्यात मिसळून जातात. सौ. जयमालाताई या सुद्धा खूप मोठ्या ताकदीने काम करत आहेत. डॉ. पियुषदादा,यशराजे पाटील हे सर्वजण आज समाजातला अविभाज्य घटक बनून आपण समाजाचे देणे लागतो ही आपल्या घराण्याची संस्कृती पुढे नेण्याचं काम मोठ्या ताकदीने करत आहेत. मागे एका कार्यक्रमांमध्ये कोळा येथे तालुक्याचे मा.सभापती संभाजीराव आलदर आपल्या भाषणात म्हणाले होते की आज तालुक्यातील सर्व पक्षांमध्ये एकही कार्यकर्ता असा नाही की ज्याने मा.आबांकडून काम करुन घेतले नाही. हेच आबांच्या राजकारणाचे वेगळेपण म्हणता येईल.अशा या कर्मवीर नेतृत्वाला पुढे जाण्याची संधी सर्व तालुक्यातील जनतेने दिली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. तरच तालुक्यातील खरं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली व न्याय मिळाला असे म्हणता येईल. पुढील संधीसाठी मा.आबांना तमाम जवळेकरांकडून खूप खूप शुभेच्छा......

Advertisement

श्री.सुहास कुलकर्णी
उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,
अध्यक्ष-ज्ञानदीप वाचनालय जवळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page