माळशिरसचे नगराध्यक्ष शिवाजी देशमुख यांचा दिपकआबांच्या हस्ते सत्कार

सांगोला : संतोष येडगे

सोलापूर जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या माळशिरस नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. माळशिरसचे नगराध्यक्ष शिवाजी देशमुख यांचा शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

विस्ताराने पूर्वीपासूनच मोठ्या असणाऱ्या परंतु नव्याने नगरपंचायत झालेल्या माळशिरस शहराच्या सर्वांगसुंदर विकासाचा आराखडा नूतन नगराध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी तयार करावा. ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून माळशिरस हे शहर जिल्ह्याच्या नाही तर राज्याच्या नकाशावर ओळखले जावे यासाठी कृती आराखडा तयार करावा. यासाठी वाट्टेल तेवढा निधी शासकीय पातळीवरून आपण खेचून आणू आणि माळशिरस शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकू असे या सत्कार समारंभ दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी अशोक देशमुख, तुकाराम भाऊ देशमुख, महादेव तात्या देशमुख, नाना चव्हाण, अन्सार शेख, सचिन टिळे, अण्णा शिंदे, मारुती बोराटे, अमोल सर्जे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

फोटो ;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page